STORYMIRROR

Archana Rahurkar

Romance

3  

Archana Rahurkar

Romance

माघ थंडीचा

माघ थंडीचा

1 min
408

राया माझी हौस हो पुरवा

बाई बाई झोंबतो गारवा...

उजेड पडला असा पुनवंच्या चंद्राचा...

राया मास हा आला माघ गुलाबी थंडीचाllधृll


काटा येई सरसर...

थंडीने राया केला कहर

सख्या यावं भरभर

शेकोटी पेटवावी सत्वर

कारभारी यावं जवळी दिस पिरतीचा...

राया मास हा आला माघ गुलाबी थंडीचाll१ll


रात ही बहारदार

शाल आना राया उबदार

हुडहुडी भर अंगी

यावं राया तुम्ही रंगामधी

नुसताच जीव का हो असा पुरवायचा

राया मास हा आला माघ गुलाबी थंडीचाll२ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance