राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ
1 min
10
दिनांक--10/5/2026
विषय--राजमाता जिजाऊ
शीर्षक-- स्वराज्य प्रेरिका
प्रकार-मुक्तछंद
-------------------------------------------------
विदर्भात सिंदखेड नगरी म्हाळसाच्या उदरी
लखोजी जाधवांच्या घराण्यात
जन्मा आले कन्या रत्न
नाव ठेवले जिजाऊ त्यांनी
राजकारण ,लष्कराचे शिक्षण घेऊनी
विवाह झाला वेरूळचे शहाजीराजे भोसल्यांशी
सामना करून अनेक संकटाशी
राजधानी खंबीर,करारी साथ देऊनी
शिवनेरी शिवबाला जन्मा देत
संकटे,सुलतानी ,असमानी,झेलूनी
पुण्याची जहागीरीची जवाबदारी
घेऊनी,रयतेला प्रोत्साहन देत
झालेले उवस्त पुन्हा स्थापिले
जडण ,घडण, संस्कार करूनी
शिवबांना शौर्याचे,नैतिकता,युद्ध
तंत्र शिक्षण देत ,गडकिल्ल्याची
निर्भयपणे सफर करण्याची
शिक्षण त्यामुळे स्वराज्य स्थापन
करण्याची शिकवणीने स्वराज्य
स्थापिले
सईबाईच्या उदरी संभाजी राजे जन्मा आले
मातृछत्र हरवीता,जिजाऊंनी
शिकवण देऊन शिवाजी,संभाजी असे दोन छत्रपति घडविले
- रायगडावरी गागा भट्टांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचा राज्य अभिषेक नयनी पाहिला
आकराव्या दिवशीं रायगडाच्या पायथ्याला पाचाड गावी निधन होता त्यांच्या इतिहासाचा शेवट झाला
लखोजी राजाची वीर कन्या
शहाजी राजांची वीर पत्नी
छत्रपति शिवरायांची वीर माता
संभाजीराजांची वीर आजी
राजमाता,राष्ट्रमाता,जिजाऊंनी
आदर्श राजा घडवला ,नी शिवरायांनी आदर्श महाराष्ट्र घडविलातं
अशी विर राजमाता जिजाऊ
लाभली महारष्ट्राला
------------------------------------------------
✍🏻अर्चना राहुरकर
ता.अकोले जा.अहिल्यानगर
