फक्त तुझ्यासह मी
फक्त तुझ्यासह मी
कधी कधी वाटतं जगात, नसावं अजून कोणी
सजवावेत सुरेल क्षण, तुझ्यासह साजणी
भरतील रंग त्यात मग, आपल्या आठवणी
वाटते असाव तिथे फक्त, तुझ्यासह मी
पानगळीची झाडांच्या सांडेल, रस्त्यावर नक्षी
सुगंधी करेल सांजेला, उल्हासी ती गुलबक्षी
मंचकावर रातराणीच्या फुलांच्या वाटते असाव
फक्त, तुझ्यासह मी
सागर किनार्यावर जिथे, आपल्या स्वप्नांचा भास होईल
वाहणारा वारा आपल्या, अस्तित्वाची चाहूल घेईल
नकळत एक लाट वाळूला, आपल्या स्वप्नांचा आकार देईल
अश्या स्वप्ननगरीत वाटते असाव
फक्त, तुझ्यासह मी
असंख्य तारकांची शाल, रात्र अंगावर पांघरेल
प्रेमसुखाच्या आपल्या विश्वात, सारी निशा गुंतेल
रंगीत छटांची प्रभा, मग पूर्वेला अवतरेल
अश्या जगात जगण्यासाठी वाटते असाव
फक्त, तुझ्यासह मी
