STORYMIRROR

Archana Rahurkar

Classics

3  

Archana Rahurkar

Classics

गवळण

गवळण

1 min
580

आजुबाजूला रान

त्यात उभं आहे ध्यान

चारी बाजूने गडी हा वाकडा

चला पोरिंनो पेंद्याला पकडा

.......पोरिंनो पेंद्याला पकडाllधृ ll


पेंद्या रामपहारी

आडवी वाट जाता बाजारी..

बाई..... चालतो कसा हा फाकडा

चला पोरिंनो पेंद्याला पकडा...

.......पोरिंनो पेद्याला पकडाll१ll


दिस आलाय वरी..

त्यात पेंद्या खोड्या करी 

बाई.... लपलाय कुठे सापडा

चला पोरिंनो पेंद्याला पकडा

.......पोरिंनो पेंद्याला पकडाll२ll


ठेवा बाजूला दूध, दही 

आता पेंद्याची खैरच नाही..

बाई.... त्याचा पायच करुया वाकडा

चला पोरिंनो पेंद्याला पकडा..

.......पोरिंनो पेंद्याला पकडा

पोरिंनो पेंद्याला पकडाll३ll


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Classics