माझ्या आईचे गुणवर्णन
माझ्या आईचे गुणवर्णन


आईच्या हृदयात
ममतेचा सागर
काळजात तिच्या
माणुसकीची घागर।
आईच्या भाळी काय
तुझ्या पदरात आली
मुकी कन्या ती बाळ
तिलाही तू कवेत घेतली।
मूक लेकराची भूक
कशी तुला गं कळे
काही न बोलता न मागता
लेकरास सर्व काही मिळे।
कुशीत घेऊनी लेकीस वाढविले
दैवाने कसा केला घात
मूक जीवाला कॅन्सरने घेरले
सेवा कराया माय जागते दिनरात।
कोण वेधील तुझ्या
धडपडीची नाव
लेकरांसाठी वणवण
सापडेना तुझ्या मनीचा ठाव।
सांभाळ देवा
आईच्या भावना
पूजा केल्याविना
एक दिवस राहिना।
आईच्या हृदयात
पांडुरंगाचा वास
राहिली शिल्लक
तुझीच आस।