दूत शांतीचा
दूत शांतीचा


जन्म जाहला
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा
भाग्य भूमातीचा
अभिमान।
दूत शांतीचा
भरला सागर ज्ञानाचा
प्रसारक धम्माचा
मौल्यवान।
लेखणी घटनेची
दावी समता, बंधुता
घालवी विषमता
उद्धरती।
क्रांतीसूर्य
भिमा अस्पृश्यांचा वाली
मानवता आली
भारतात।
तरला दलित
संघटित भारत देश
कर्तृत्वाचा वेष
धम्मचक्र।