व्यथा साहित्यीकांच्या...
व्यथा साहित्यीकांच्या...


लिहिते मनीचे भाव
साहित्यिकास सापडेना नाव।
शब्दांची गुंफण साजली
साहित्यिकांची मान-पान कागदावर राहिली।
कधी मिळाला पुरस्कार
काहीच म्हणती हुशार।
साहित्यिक लेखणीत रमतो
त्याच्या कलेचा आदर कोण करतो।
साहित्यिकाने लेखणीत ओतले तन मन
त्यास मिळावं शब्दाचं कौतुक हेच त्याचं धन।