तरुण शेतकरी
तरुण शेतकरी


तरुण तडफदार
शेतकरी हुशार
हाती लॅपटाॅप
पिक घेई फार।
शेतीमंदी हिरवाई
मोबाईल कानी
आधुनिक तंत्रज्ञान
रुबाबदार राहणी।
पिकपाणी भरघोस
मुखी विलसतसे
हातातली काठी
निशाणी दिसतसे।
झाला शेतकरी राजा
घडविली हरितक्रांती
जगातील जनता सारी
शेतीमुळे भाकरी खाती।