प्रेम
प्रेम


रिमझिम पाऊस
अवखळ धारा
गूज प्रीतीचा
मनी फुलोरा।
चिंब बिलगती
स्पर्श हळुवार
गूज प्रीतीचे
कवेत जपणार।
प्रीती जडली
दोन जीवांची
ओठात ओठ
प्रीती मिलनाची।
प्रेमात वेडी
तुझीच साथ
गूजते भाबडी
प्रीतीची साद।
मोहक ती जलधार
केसांत रुंजते
मन भावनांकुर
प्रेम गूजन स्फुरते।