वेळ...
वेळ...
निसटून चाललेली वेळ कधी
चिमटीत पकडता येत नाही
कितीही बलदंड बेडी असो
वेळ जखडून ठेवू शकत नाही
वेळ भास आभासाचा खेळ नुसता
किती गेला-राहिला मोजत बसता
कणाकणाने सरत जातो नकळत
दिसत नाही ठेवा कितीही पाळत
सदुपयोग करा हातातल्या वेळेचा
गेलेला वेळ परत नाही हो यायचा
अमाप आहे तरी व्यर्थ नका दौडू
आळसाचं खापर नका वेळेवर फोडू