तुझ्या नसण्याची सवय झाली आता..
तुझ्या नसण्याची सवय झाली आता..
1 min
587
असण्याने पडतो फरक तुझ्या,
पण तुझ्या नसण्याची सवय झाली आता.
सतत वाटतं पाहत राहावं तुला,
पण तुझ्या न दिसण्याची सवय झाली आता.
भरभरुन वाटतं बोलावं तुझ्याशी,
पण तुझ्या अबोल्याची सवय झाली आता.
खूप काही वाटतं सांगावं तुला,
पण तुझ्या न ऐकण्याची सवय झाली आता.
वाटतं असचं कायम राहावं सोबत तुझ्या,
पण तुझ्या सोबतीशिवाय त्या ऐकटेपणाची सवय झाली आता.
