STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Classics

3  

Ramkrishna Nagargoje

Classics

कुरुक्षेत्र रणभूमी

कुरुक्षेत्र रणभूमी

1 min
294

कुरुक्षेत्र रणभूमी,

कारुण्य करु नको,

जुलूम केले किती,

तया विसरु नको,

उठ घे बाण लवकरी,

क्षत्रिय धर्म सोडू नको...


प्रयत्न कर सारे,

हार जित परिणाम,

शोधू नको,

मी मारल्या कौरव मरती,

असे समजू नको...


महामोह काळसर्प,

सोड विळखा सारा,

पुण्यकाल पातला,

किर्ती सोडू नको...


अर्जुन तू वीरवृत्तीचा,

अपकिर्ती करु नको,

पापात बुडाले कौरव,

नितीधर्म सोडी राजा,

दुष्कर्म करतो धृतराष्ट्र,

तुज पुण्यकाल पातला,

अर्जुना ही वेळ सोडू नको...


क्षत्रिय तू अर्जुन,

असतील नाते तूझे,

गुरु, बंधू, पितामह,

बहू पापे केली यांनी,

आता सोडील सुदर्शन,

सत्य सत्य परमेश्वर...


उठ घे गदा, भिमा

फोड फोड मांडी, त्याची,

तो पहा,

कर्दमी फसला दुर्योधन...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics