आठवणी, त्या सुंदर आठवणी...
आठवणी, त्या सुंदर आठवणी...
आठवणी, त्या सुंदर आठवणी.
हृदयाच्या एका कोपर्यात जपून ठेवलेल्या त्या आठवणी.
रोजच, नेहमीच, तेच आयुष्य जगताना,
आपल्याही कळत-नकळत तयार होऊन जातात त्या गोड आठवणी.
मग कधी वाटलं एकटं आयुष्यात,
तर चेहर्यावर सुंदर हसू देऊन जातात त्या आठवणी.
कधी गप्पांच्या ओघात तर कधी मैफीलींचा फड रंगवताना,
सांगितल्या जातात त्या रोमांचक आठवणी.
मग त्यातल्याच कोणाला कधी आपल्याशा वाटतात,
तर कोणाला एक वेगळाच अनुभव देऊन जातात त्या आठवणी.
आयुष्याच्या वेलीवर फुले उमलताना,
मनाच्या तळाशी खोलवर साठवून ठेवल्या जातात त्या नाजूक आठवणी.
मग असेच शांत, एकांतात, स्वतःशी बोलताना,
निःशब्द करुन जातात त्या आठवणी.
