STORYMIRROR

SAURABH AHER

Classics

4  

SAURABH AHER

Classics

माय मराठी

माय मराठी

1 min
320

माय मराठी आमुची ,

अमृताची तीला गोडी ...

ज्ञानोबांच्या ,तुकोबांच्या,

अभंगाची तीला जोडी ..


माझी साधीभोळी भाषा 

खुप मधाळ मधाळ ..

पाजे शब्दांचाच पान्हा

माय दुधाळ दुधाळ..


पहाटेच्या प्रहराला ,

ओव्या गाई माझी माय ...

मराठीचा गोड स्वर ,

पान्हा सोडतसे गाय ...


माझी मराठी समृद्ध, 

माऊलींची ज्ञानेश्वरी ..

शब्दां शब्दात वसला,

माझा पंढरीचा हरी ..


काना मात्रा विभुषीत ,

शोभे वेलांटी उकार ...

भाळी उभा अनुस्वार,

माय मराठी साकार...


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Classics