माय
माय
1 min
351
अंतरीच्या वेदनेला
किती फुटलेत फाटे ..
तिमीराला छेदताना
माय अंगारचं वाटे ..
तुझा संघर्ष पाहुन
फुल बनलेत काटे ..
नशिबाशी भांडताना
माय हिमालय वाटे ..
घरासाठी राबताना
थेंबे थेंबे रक्त आटे ..
वादळाशी झुंजताना
माय वाघिणचं वाटे ..
तुझ्या मुखातले बोल
गोड अमृताचे साठे ..
कुशीमध्ये निजताना
माय आभाळच वाटे ..
तुज न्याहाळता थोडं
पाणी डोळ्यातलं दाटे
आयुष्याले चालताना
माय कविताचं वाटे
प्रेम माईचं निराळं
गाय वासराले चाटे ..
तीचे चरण देखता
माय भगवंत वाटे ..