STORYMIRROR

SAURABH AHER

Inspirational

3  

SAURABH AHER

Inspirational

विठाबाई

विठाबाई

1 min
281

माझे माऊली गे । तुज आळवितो ॥

प्रेमे बोलावितो । पांडुरंगा ॥१॥


किती मारू हाका । थकली रसना ॥

कुठेच दिसेना ॥ वाली माझा ॥२॥


 जाहलो पोरका । मज नाही कुणी ॥

मायबाप दोन्ही । तुच देवा ॥३॥


अरे चक्रपाणी । कुठे रमलासी ॥

कारे रूसलासी । मजवरी ॥४॥


देवा तुझे गुण । गाईन आवडी ॥

सोडवावी आडी । प्रपंचाची ॥५॥


माय विठाबाई । मज घाली भीक ॥

दाखवावे मुख । एकवेळा ॥६॥


विनवी माऊली । जोडुनिया कर ॥

करा उपकार। नारायणा ॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational