पदर माझ्या मायेचा
पदर माझ्या मायेचा
माझ्या मायचा पदर
संकटांना पेलनारा .
माळरानी राबताना
उन्हतान्ह झेलणारा .
माय पुसते आसवं
अन् न्याहाळते मुख .
माऊलीच्या मायेपुढे
फिके पडे स्वर्ग सुख .
झळणाऱ्या वादळांना
देते उत्तर हसुन .
माय भिडे संकटांना
घट्ट पदर खोचुन .
बंध मायेचे गुंफुनी
सावरते घरदार .
फाटलेल्या पदराची
नाही पैठणीला सर .
माझ्या माईचा पदर
जसा विठोबाचा शेला .
पदराच्या छायेमध्ये
पान्हा पाजतसे मला .