आस दर्शनाची
आस दर्शनाची
मनासी लागली । आस दर्शनाची ॥
तुला भेटण्याची । पांडुरंगा ॥१॥
किती आळवु हो । सख्या भगवंता ॥
तुम्हि कृपावंता । नारायणा ॥२॥
संत मायबापा । करा उपकार ॥
सांगा नमस्कार । विठ्ठलासी ॥३॥
अनाथांची माय । सावळी विठाई ॥
लेकरांची आई । जगजेठी ॥४॥
धाव देवा आता । नको पाहु अंत ।
माझा भगवंत । तोची हरी ॥ ५॥
पंढरीचा राया । उभा विटेवर ॥
कर कठेवर । ठेवोनिया ॥६॥
जन्मोजन्मी मज । घडो तुझी सेवा ॥
विनंती ही देवा । चरणासी ॥७॥