नारी
नारी
संसाराचा गाडा ओढत ,
मदतीचाही हात देते ...
पाठीमागे वळुन तीचं
खंबीरपणे साथ देते...
पावलावर पाऊल तिचं ,
परक्यांनाही गोंजारते ..
काट्याकुट्याचा रस्ता ,
संकटांना झुंजारते ...
नारी कधी ताई होते ,
कधी माय बनुन राहते ...
आईच्याच काळजाने ,
इतरांची काळजी घेते ..
