स्कंद माता
स्कंद माता
पुजा ती पंचम दिनी
स्कंद मातेची करुया
चतुर्भुज रुप छान
नेत्री तिचे साठवूया १
सिंहारुढ होवून तु
माते येई लवकरी
हात जोडीतो माते
मजवर कृपा करी २
दो हाती कमल पु्ष्प
एक हाती वरदान
आलो शरण तुजला
देई तु अभयदान ३
मांडीवर कार्तिकेय
कुमार स्कंद शोभतो
स्कंद माता त्रिखंडात
तुझा डंकाच घुमतो ४
शुभ्र रंग प्रिय तुला
वस्त्रे धवल लेवून
पुजा करू मनोभावे
करु मातेला नमन ५
