STORYMIRROR

somadatta kulkarni

Abstract Classics Inspirational

4  

somadatta kulkarni

Abstract Classics Inspirational

संगत

संगत

1 min
4


संगत चांगली

नित्य हि असावी 

दुष्टाची संगत 

मुळीच नसावी. १


दुर्योधन संग 

कर्णाने तो केला 

अर्जुना करवी 

नाश त्याचा झाला २


असंगाशी संग 

प्राणाशी ती गाठ 

हेच खरे आहे 

जाणा खुणगाठ  ३


केशवाचा संग 

अर्जुनाने केला 

धनुर्धर भला 

विख्यात जाहला  ४


करु संत संग 

सार्थक होईल 

असार संसार 

तरून जाईल.   ५


दुष्ट जन संग 

सर्वथा टाळावा 

ईश्वरी आदेश 

सदैव पाळावा  ६

©®सोमदत्त कुलकर्णी 

     हडपसर, पुणे 




Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract