पंढरीची वारी
पंढरीची वारी
शीर्षक: पंढरीची वारी
येतो रे वारीला
बा विठ्ठला बापा
घेई सांभाळून
असो द्यावी कृपा १
पाऊले चालती
वाट पंढरीची
वारी मी करतो
सेवा ईश्वराची. २
पंढरीची वारी
आहे माझ्या घरी
विटेवरी आहे
सावळा श्रीहरी ३
आषाढी कार्तिकी
वारी मी करतो
सावळ्या चे रुप
मनी साठवतो. ४
हरिपाठ गात
करीन मी वारी
हरिनामी सुख
मिळेल हे भारी ५
पंढरीची वारी
वाटे सौख्य भारी
किर्तनी रंगलो
नाम घेतो हरी ६
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर पुणे
