रात्र पौर्णिमेची
रात्र पौर्णिमेची
शीर्षक : रात्र पौर्णिमेची
अजुन आठवे ती
रात्र मज पौर्णिमेची
तुझ्या अन माझ्या
पहिल्या भेटीची १
तुझ्या अन माझ्या
बहरलेल्या स्वप्नांची
शुभ्र चांदण्या रात्री
मधुर अशा प्रीतीची २
फुललेला चंद्र अन्
फुललेली प्रीती
साक्ष त्या चांदण्यांची
सखी तु समीप होती ३
कोजागिरीचा चंद्र
फिका भासे मजला
शुभ्र चांदण्यात टिपतो
डोळ्यांनी मी तुजला ४
जपले आहे हृदयात
क्षण प्रीतीचे बरोबर
देतील साथ निरंतर
स्मृती मज खरोखर ५
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर पुणे

