उष्णोदक
उष्णोदक
उष्णोदक ऐसे
चहास म्हणती
अमृत भुलोकी
जन संबोधिती १
सुरू होतो दिन
चहा प्राशनाने
बहरते तनू
माझी आनंदाने २
घेता घोट घोट
चहा सावकाश
लागण्या समाधी
नाही अवकाश ४
खरा तो अभागी
चहावीना राही
स्वर्गीचा आनंद
मुकला तो पाही ५
किती पिता चहा
विचारता पाही
सांगतो मी त्यास
मोजत मी नाही ६
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर पुणे
