पाऊल
पाऊल
जग हे फसवे आहे
टाक जपून पाऊल
चालताना पदोपदी
ठेव धोक्याची चाहूल १
मोहमयी जग आहे
नाही सहज हि वाट
नको पडू देऊ भुल
इथे सर्व फक्त भाट २
नाही चाड ती नीतीची
जो तो पैशाचाच दास
गोड शब्द बोलतील
असे तो प्रेमाचा भास ३
ऐक तुजला सांगतो
टाक पाऊल जपून
बघ अन्यथा पोळेल
वैशाखाचे तुज ऊन ४
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर, पुणे
