STORYMIRROR

somadatta kulkarni

Children Stories Inspirational Others

4  

somadatta kulkarni

Children Stories Inspirational Others

बालपण

बालपण

1 min
3


 रम्य असे बालपण
 आठवते मज फार
 सुख अवती भोंवती
 मोद विहरे अपार १

 नसे चिंता नाही ताण
 नाही खेळाला सुमार
सुखी अवघे आयुष्य
नाही जीत नाही हार २

 काळ सुखाचा सुरम्य
 नाना रंगीं नाना ढंगी
चित्त आनंदे रंगले
आनंदची माझे अंगी ३

 भान खेळात हरपे
कशाची काळजी नसे
चित्त वृत्ती बहरल्या
 स्वर्ग हाती आला भासे ४

 ©®सोमदत्त कुलकर्णी
  हडपसर ,पुणे 


Rate this content
Log in