नाते
नाते
नाते
एकदा मला
प्रश्न पडला
मनाच्या खोल
कप्प्यात दडला १
नाते मैत्रीचे
कसे असते
सांगा मला
कसे दिसते? २
नाते हे मैत्रीचे
आगळे वेगळे
मैत्रीची नशा
चाखतात सगळे ३
मैत्रीची ही अदा
क्षणात हसवते
होता थोडा दुरावा
क्षणात रडवते ४
नसतो आड पडदा
संपतो भेद भाव
होता खरी मैत्री
नाही रंक नाही राव. ५
जपावे निरंतर
मैत्रीचेच नाते
विसरतात इथे
सर्व नाते गोते. ६
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर, पुणे
