भावंड
भावंड
शीर्षक: भावंड
भावंड हवीत
आयुष्यात खरी
असतील भेद
त्यांच्या मध्ये जरी १
भावंड हवीत
करण्या गुज गोष्टी
त्याशिवाय कशी
बहरेल हि सृष्टी. २
वाटू सुख दुःख
आप आपसात
त्यावीना कशी होय
आनंदाची बरसात. ३
सुख भावंडांचे
असते अलौकिक
त्यावीना दुनियेत
नसे दुजे कवतिक ४
राहू खेळीमेळीने
इथे नित्य निरंतर
भावंडे सर्व आपली
नसावे काही अंतर ५
©©सोमदत्त कुलकर्णी
हडपसर, पुणे
