वेड
वेड
मजला जडले
वेड पुस्तकांचे
पुस्तके असती
माझे दोस्त साचे १
जातो हरवून
मी सर्व जगाला
वाचता पुस्तके
आनंद मनाला २
पुस्तके ही गुरू
माहिती मिळते
वाचन करता
प्रगल्भता येते. ३
वाचावी पुस्तके
आवडीने नित्य
व्यासंग वाढेल
वाचनाने सत्य. ४
वाचन संस्कृती
वाढो समाजात
तरीच हटेल
भेद जात पात. ५
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर, पुणे
