STORYMIRROR

somadatta kulkarni

Abstract Classics Inspirational

4  

somadatta kulkarni

Abstract Classics Inspirational

परिचारिका

परिचारिका

1 min
1


परिचारिका ही
सेवा व्रत घेते
असिधारा व्रत
पालन करते १

रुग्ण सेवा तिचे
कर्तव्य प्रथम
काळजी रूग्णांची                               
हाच तिचा धर्म २

माता, पित्या सम
काळजी घेतसे
रूग्णांच्या चिंतेने
अस्वस्थ होतसे ३

आस्थेने पुसते
मायाही लावते
मानवतेची ती
मुर्तीच असते ४

परिचारिका ही
असते सोज्वळ
रूग्ण विसरती
दु:ख ते सकळ ५

अहर्निश सेवा
व्रत तिचे आहे
दिन रात्र कष्ट
एक तीच साहे ६

©®सोमदत्त कुलकर्णी  
       हडपसर, पुणे 

सर्व परिचारिका भगिनींना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract