STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

बाईचे बाईपण

बाईचे बाईपण

1 min
186

'बाईचे बाईपण'

खरतर बाईला तिच

 बाईपण नको असतं

पण बाईशिवाय घराला 

घरणही नसतं

कारण घराची सुत्र 

तिलाच स्विकारायची असतात

तिच्याशिवाय देव्हाऱ्यात

 दिवे लागत नसतातं


आयुष्यभर संघर्षाचा प्रवास

 तिच एकटी करत असते

बाई म्हणून ती कुणालाच कळत नसते

देह तिचा ती आतल्याआत जळत असतो

तिच्या बाईपणाला कुणाचाच आधार नसतो


घराचा उंबरठाही

बाईशिवाय कोणी पुजत नाही

तिने उंबरठा पुजल्याशिवाय

घरात प्रवेश होत नाही

तिचा जन्म घेण्याने

किती संदर्भ बदलतो

तिच्याचमुळे तर घराचा उध्दार होतो


पण तिच जगण कुणालाच दिसत नाही

तिचा विटाळही कुणाला सहण होत नाही

बाळांतपणाचा त्रास सहण करून ती

वंशावळ वाढवत असते

पाच दिलस तिच बाईपण

दुर ठेवत असते


ती कधीच सांगत नाही

तिच्या मनातल्या वेदना

आणि कुणालाही कळत नाही संवेदना

किती किती नजरांनी ती कितीदा

जखमी होत असते

अशाही गर्दीत ती तिच बाईपण सांभाळत असते


बाई आणि भुईच सारखंच असतं

अवकाळी वेदनेत विरघळायचं असत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational