दांडिया-गीत
दांडिया-गीत
खेळ,खेळू या नवरात्रीचा खेळ,खेळू या
टिपरीच्या तालावर फेर धरू या
या रे या रे सारे या रे,लवकर या रे
गाण्यांच्या चालीवर, ठेका धरूया रे
गाण्याच्या बोलावर नाचे पोरं पोरी
दिवसभराचा शीणभाग विसरी
उपवासाचा आनंद न्यारा
देवी वर भरोसा सारा
श्रद्धेने पुजती देवीला
साक्षात्कार होई भक्त गणाला
नऊ दिवसांचा,नऊ रंगाचा
आनंद घेई नव्या साड्यांचा
आनंदात रंगून सारे, दुःख विसरून जा रे
या रे या रे सारे तासभर वय विसरा रे
आनंद जीवनाचा खरोखर घ्या रे
आपल्या कलेला आपण पुढे न्या रे
टाळ्यांच्या तालावर,पायांच्या ठेक्यावर
मागे पुढे, खाली वर नाच होई मैदानावर
खेळ हा माणूसकीचा,राष्ट्रीय एकात्मतेचा
बहुभाषिक,आगळ्या ढंगाचा
जोडून नाते बंधुभावाचे सन्मान थोरा मोठ्यांचा
देवी वर भरोसा सारा
श्रद्धेने पुजती देवीला
साक्षात्कार होई भक्त गणाला
नऊ दिवसांचा,नऊ रंगाचा
आनंद घेई नव्या साड्यांचा
आनंदात रंगून सारे,दुःख विसरून जा रे
या रे या रे सारे तासभर वय विसरा रे
आनंद जीवनाचा खरोखर घ्या रे
आपल्या कलेला आपण पुढे न्या रे
टाळ्यांच्या तालावर,पायांच्या ठेक्यावर
मागे पुढे, खाली वर नाच होई मैदानावर
खेळ हा माणूसकीचा,राष्ट्रीय एकात्मतेचा
बहुभाषिक,आगळ्या ढंगाचा
जोडून नाते बंधुभावाचे सन्मान थोरा मोठ्यांचा
