असेल कुणीतरी
असेल कुणीतरी
1 min
284
असेल कुणीतरी आयुष्यात,
पावलोपावली साथ देणारं..
भासलीच गरज कुणाची ,
तर मदतीचा हात देणारं ..
असेल कुणीतरी आयुष्यात,
आपल्या हाकेला आव देणारं ..
जर विकलोच गेलो बाजारात,
तर मैत्रीला खरा भाव देणारं ..
असेल कुणीतरी आयुष्यात ,
खंबीर असणारी ढाल होणारं ..
जीवघेण्या त्या गुलाबी थंडीत
प्रेम उब देणारी शाल होणारं..
असेल कुणीतरी आयुष्यात ,
माझ्या शब्दांना धार देणारं ..
जेव्हा खचलो असेल मीही ,
कुणीतरी आधार देणारं ...