SAURABH AHER

Inspirational Others Children

3  

SAURABH AHER

Inspirational Others Children

बाप शब्द लिहिताना...

बाप शब्द लिहिताना...

1 min
366


गाथा बापाची सांगतो ,

ऐक ऐक माझ्या दोस्ता ...

मला घडवण्यासाठी, 

बाप किती खातो खस्ता ..


सदा नशीब बापाशी

खेळ खेळत राहीला ...

बाप मुकाट होऊन

घाव झेलत राहीला ...


फाटलेल्या सदऱ्याला ,

बाप ठिगळं लावतो ..

उसवल्या नशिबाला ,

बाप घामाने शिवतो ..


बाप दुष्काळ झेलतो ,

उरातल्या दमावर ..

बाप सोन पिकवतो ,

अंगातल्या घामावर ..


आयुष्याचा केला होम 

त्याचे झिजलेले तन ...

तुझ्या कष्टाचा रूपया ,

मला कुबेराचे धन ...


डोंगराहुनही उंच,

माझ्या बापाचं कर्तृत्व ...

धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ, 

माझ्या मायेचं मातृत्व...


त्याच्या घामाच्या थेंबाने ,

माझे आयुष्य घडते ...

बाप शब्द लिहिताना ,

माझी लेखणी रडते ...


Rate this content
Log in