STORYMIRROR

Kalyani Deshpande

Inspirational

3  

Kalyani Deshpande

Inspirational

वासना

वासना

1 min
198

कशी ओळखणार तुम्ही वासनांध नजर?

होईल का कुठून कोणता सूचक गजर?


करेल प्रयत्न कोणी जर करण्याचा सलगी

तेव्हाच ओळखा वाजली धोक्याची हलगी


भुलून गोड बोलण्याला जर एखादी हसली

तर समजा ती फेकलेल्या जाळ्यात फसली 


तिचं हसणं मग समजलं जाईल तिचा होकार

आणि त्याच्या अटींचा केला तिने स्वीकार


मग भेटीसाठी तो तिला मागेल एकांत

आणि स्थळ भेटीचं ठरेल अनोळखी प्रांत


इथे प्रत्येक मुलीने राहायला हवं सावध

बेसावध राहिलात तर नक्की आहे पारध


योग्य वेळीच द्यायला शिका ठामपणे नकार

तरच स्त्रिया होणार नाहीत वासनेचा शिकार

        


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational