STORYMIRROR

Kalyani Deshpande

Comedy

3  

Kalyani Deshpande

Comedy

लग्न पाहावे करून

लग्न पाहावे करून

1 min
160

जरा कुठे दिसताच मुलगा वा मुलगी स्वतंत्र

लगेच नातलग घरच्यांना देतात कानमंत्र

शिक्षण झालं,नोकरी झाली,जाईल वय सरून

करा घाई, नका बसू थंड, द्या लग्न करून

मुला वा मुलीचं ठरेपर्यंत लग्न, नसे त्यांना उसंत

वय चाललं वाढत म्हणती,होणार ना मग पसंत

हो-हो नाही म्हणता म्हणता लग्न जाते ठरून

मुला वा मुलीलाही मग वाटते पाहावं लग्न करून

लग्नाचे लाडू खाल्ल्यावर सुरू होते आप्तांची पेढे किंवा बर्फीची चर्चा

दरम्यान दिसला एखादा अविवाहित की लोकं वळवतात तिकडेच मोर्चा

एकंदरीत शांतपणे स्वतंत्र जीव लोकांना काही केल्या नाही पाहवत

स्वतःप्रमाणे त्यालाही बंधनात अडकवल्याशिवाय त्यांना नाही राहवत.

मुला वा मुलीला लग्नबेडीत अडकवण्याचा असतो त्यांना एकच ध्यास

एकदा का अक्षदा डोक्यावर टाकल्या की घेतात ते मोकळा श्वास



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy