गणप्याची गोस्ट
गणप्याची गोस्ट
काय सांगू तुमाले आमच्या गावातल्या गणप्याची गोस्ट
रोज जवळ करे तो गावातलं एकुलतं एक पोस्ट
उन्हा तान्हात ये चढत तो उंचच उंच घाट
मंग पाह्यत राहे तो पोस्ट हाफीस उघडायची वाट
एकदाचं मंग करकरत उघडे पोस्ट हाफिस चं दार
लगबग करे गणप्या,त्याले हरीक ये फार
काचेमांगे सायेब बसेलोक त्याले निघना धीर
सायबाचा मुखडा म्हातूर ऱ्हाई लय गंभीर
आली कावो सायेब मनी आरडर माही वाली?
सायेब ऱ्हाई गप घालून मुंडकं पार खाली
अपेक्षेने उत्तराच्या गणप्याचा होई जीव थोडा थोडा
खेटे कायले घेता आबाजी? कायले झिजवता जोडा?
असं उत्तर ऐकल्यावर त्याच्या डोयातलं पानी येई गाली
अडचणीत आसल ल्योक माह्या तो स्वतःचीच समजूत घाली
