STORYMIRROR

Kalyani Deshpande

Tragedy

3  

Kalyani Deshpande

Tragedy

मृगजळ

मृगजळ

1 min
209

तहानलेले हरीण एकदा शोधत होते पाणी

वणवण भटके वाळवंटी दिसे न त्यास कोणी

दूर जलाशय दिसू लागता हरीण धावू लागे

हाती न लागे जल हरणाच्या विरुनी जाई वेगे

तृष्णेने व्याकुळ मृगाला येई जेव्हा भोवळ

क्लान्त शरीरा आधार द्याया जवळ करी तो कातळ

रुक्ष मरुस्थळी व्यर्थ फिरुनी प्रयत्न गेले निष्फळ

रेतीमधुनी न मिळे पाणी,हे तर आहे मृगजळ



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy