STORYMIRROR

Kalyani Deshpande

Others

3  

Kalyani Deshpande

Others

आयुष्य म्हणजे वन वे रोड

आयुष्य म्हणजे वन वे रोड

1 min
136

आयुष्य म्हणजे वन वे रोड

येती प्रवासात अनुभव कटू वा गोड


निर्णय लागती घ्यावे नीट करून विचार

अथवा पश्चातापाचा वहावा लागे भार


कसूर जर केली निवडण्या अचूक वाट

आयुष्याचा निश्चित होई दुस्तर घाट


सदैव नसते उपयोगी स्वप्नांचे विमान

जीवन जगताना हवे वास्तवाचे भान


कधी फायदेशीर ठरती वडीलधारे दिशादर्शक मॅप

कमी होई ज्याने प्रवासाचा क्षीण आणि व्याप


कधी निरुपयोगी ठरती मळलेल्या पाऊलवाटा

उगीच पडत जाई मग फुकटचा हेलपाटा


प्रत्येकाचा रस्ता आयुष्याचा वेगवेगळा असे

अंधानुकरण करण्यात प्रवासी हमखास फसे


 आयुष्याचा योग्य रस्ता मिळण्याचे हेच आहे गम्य

दरवेळी निर्णय घेताना ठेवावे लागे तारतम्य


अनेकदा एकाचा अनुभव दुसऱ्याला न येई कामी प्र

त्येकाला शोधावी लागे आपापली युक्ती नामी


 प्रवासात आयुष्याच्या असो अडाणी वा शिकलेला

रेषा संचिताच्या ठरवती मार्ग बरोबर की चुकलेला


 म्हणूनच शांत डोकं ठेवून आयुष्यात घ्यावी ऍक्शन

कारण जीवनाच्या प्रवासात नसते रिव्हर्स रिऍक्शन


 नका करू घाई, करून ठेवा तुम्ही हे मनात जतन

आयुष्याच्या प्रवासाला नसते कधीच एडिट बटन.


Rate this content
Log in