STORYMIRROR

Kalyani Deshpande

Inspirational

3  

Kalyani Deshpande

Inspirational

स्वातंत्र्याच्या लाख शुभेच्छा

स्वातंत्र्याच्या लाख शुभेच्छा

2 mins
4

परतंत्राची मोडून बेडी

उभी राहिली स्वराज्य गुढी

सफल थोरजनांच्या इच्छा

स्वातंत्र्याच्या लाख शुभेच्छा


हर्षोल्हासाने हृदय भरले

हुतात्म्यांचे अश्रू झरले

गुलामीचे दिन ते सरले

दुःखाचे कारण न उरले


स्वसौख्याची त्यागून आस

स्वराज्याचा घेऊन ध्यास 

प्राणपणाने सारे झटले

परसत्तेचे जाळे फिटले


परसत्तेचा जुगारत रोष

जयहिंद चा करुनी घोष

एकसंघ झाला भारत सारा

वंदे मातरम चा घेऊनि नारा


करा मित्रहो आज विचार

परशत्रूने का केला वार? 

जाती-धर्माचा जाणून भेद

स्वातंत्र्याचा घेतला वेध


म्हणून हवी अखंड एकता

मिळेल ती जातीद्वेष सोडता

ठेवून उपकारांची जाण

क्रांतीसुर्यांना द्यावाच मान


विचार करा जर नसते ते तर

जीवन आताचे असते जर्जर

आले तयांचे कामी यत्न

सफल झाला हा स्वराज्य यज्ञ


भारतीय संस्कृती असे महान

मनी असावा हा अभिमान 

टाळुनी परकीयांचे अनुकरण

करू स्वकीयांचे अनुसरण


भारतभूच्या घेऊ सदिच्छा

स्वातंत्र्याच्या लाख शुभेच्छा

जय हिंद जय भारत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational