STORYMIRROR

Kalyani Deshpande

Others

3  

Kalyani Deshpande

Others

आवडता चित्रपट

आवडता चित्रपट

1 min
152

कोणता आहे तुमचा आवडता चित्रपट

विचारताच अनेक नावं आठवती पटापट

प्रत्येक चित्रपटाची असते एकेक खासियत

प्रेक्षकांसमोर मांडतो तो आपापली कैफियत

काही सिनेमे बघताना वळते हसून मुरकुंडी

काहींमध्ये असे फक्त मारझोड आणि भांडाभांडी

काही सिनेमे दाखवती सामाजिक दुःख व सुख

काही विचार करायला लावून करतात अंतर्मुख

काही चित्रपटात येते प्रेमकथेला उधाण

काहींमध्ये नायक देई देशासाठी प्राण

काही चित्रपटात नट-नटी वाहे कुटुंबाचा भार

काहींमधले नट-नट्यांना मिळे BMW कार

काही सिनेमात नट-नट्यांची असे सात्विक राहणी

काहींमधले असतात प्यायलेले बारा गावचे पाणी

काही सिनेमे बघता येतात सहकुटुंब सहपरिवार

काहींमध्ये असतो गूढ भय रहस्याचा थरार

काही सिनेमे करतात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन

काही दाखवती आरसा आणि घालतात नेत्रअंजन

सिनेमागृहातला असो वा असो टीव्ही वरचा फुकट

जो तो बघतो आवर्जून आपल्या आवडीचा चित्रपट


Rate this content
Log in