पुस्तके
पुस्तके
पुस्तके असतात भलतीच ग्रेट
क्षणात मनाला भिडतात थेट
ज्ञानाचा ज्यात आहे महासागर
एकेक पुस्तक जणू एकेक घागर
नाही अवडंबर,नाही अतिरंजितपणा
खऱ्या इतिहासाच्या मिळे पाऊलखुणा
थोरांच्या चरित्रांची माहिती मिळे खरोखर
मालिका सिनेमांना येईल कुठून त्याची सर
पुस्तकांसारखी दुसरी नसे भेटवस्तू
असो सण, वाढदिवस वा असो गृहवास्तू
कुठल्याही वयात पुस्तकांशी होते मैत्री
सुसंगती मिळाल्याची मनास असते खात्री
वाट चुकताच पुस्तके धरतात आपला कान
अज्ञानाचे भेदून जाळे,देतात वास्तवाचे भान
पुस्तके असो छापील वा असो स्क्रीन डिजिटल
माहिती मिळे समान,वाचनाचा हेतू होई सफल
छापील पुस्तकांच्या कोऱ्या सुवासाला नसे काही तोड
डिजिटल पुस्तके वाचताना दयावी लागे चष्म्याची जोड
पुस्तकांचा मित्रहो सोडू नका कधी तुम्ही हात
पुस्तकेच आहेत खरी जी देतील जन्मभर साथ
