STORYMIRROR

Kalyani Deshpande

Classics

3  

Kalyani Deshpande

Classics

दिवाळी

दिवाळी

1 min
158

उजळले अंगण,उजळला परस


दिवाळीच्या प्रथम दिनी असे वसूबारस


सुवर्णालंकारांची खरेदी होते ह्या विशेष दिवशी


दिवाळी चा दुसरा दिवस असे धनत्रयोदशी



नरकासुराची कथा सांगती लहानांना ह्या दिवशी


दिवाळीचा तिसरा दिवस असे नरकचतुर्दशी



लक्ष्मीदेवीची पूजा ह्या दिवशी करती सारे सज्जन


दिवाळीचा मुख्य दिवस असतो लक्ष्मीपूजन


स्मरणात राही सगळ्यांच्या बळीराजाची कथा सदा


दिवाळीचा पाचवा दिवस असे बलिप्रतिपदा



पंचपक्वान्न बनवून भावाला ओवाळतात बहिणी हौशी


दिवाळीची होते सांगता भाऊबीजेच्या दिवशी




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics