STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

4  

Shila Ambhure

Tragedy

माझी हास्यव्यथा

माझी हास्यव्यथा

1 min
29.9K




सांगतो राव तुम्हाला

माझ्या संसारांची कथा.!

हासू आणि आसवांत

भिजलेली माझी व्यथा.


लग्न करून आणली

बायको गोड लाजरी.

वजनाने असेल ती

क्विंटलाच्या वर तरी.


उखाण्यांच्या स्पर्धेत

तिने कहरच केला.

नाव घेतले मित्राचे

झालो मीच अर्धमेला.


झोपण्या पुरेना तिला

लाकडी दिवान मोठा.

घोरायची अशी जणू

शेजारीच आहे गोठा.


लाडे लाडे बोलुनिया

नेते हॉटेलात रोज.

ताट माझे खाऊनिया

बोले 'करू प्रीतिभोज'


झोपून राहते सदा

करतच नाही काम.

घरीदारी राबतो मी

पुसत असतो घाम.


भारी असते खुशीत

एक तारखेला स्वारी.

संपविते पगार ती

खरेदीची हौस न्यारी.


बोलता मी शब्द कटू

भोकाड ती पसरते.

माहेरी जाईन कशी

धमकी मलाच देते.


तिच्या अशा बोलन्याला

पुरता मी घाबरतो.

'बायडी माझी लाडकी'

म्हणून तिला थांबवतो.


लग्नाआधी होतो वाघ

शेळीवानी झालो भित्रा.

तूच माझ्या जीवाभावा

व्यक्त होऊ दे रे मित्रा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy