STORYMIRROR

pallavi bhatia

Tragedy

4  

pallavi bhatia

Tragedy

पाऊस रडतो

पाऊस रडतो

1 min
27.2K



पाऊस रडतो

मुंबईला का तो घाबरतो


त्याचा फक्त एकच ध्यास

तृप्त करू प्रत्येक जीवास

क्षीण झालेल्या तिच्या प्रत्येक कणास

पण समावे तरी कसे तिच्यात

झाले सर्वांग तिचे स्टील आणि काँक्रेट इतक्यात

म्हणून का पाऊस रडतो

मुंबई ला का तो घाबरतो


आक्रंदतो आणि कोसळतो

तिच्या गर्भाशी पोहचू पाहतो

पोषण करीन वृक्ष मुळान्चे म्हणतो

पण वाट अडवून रास्ता बसतो

निष्ठुर काँक्रेट कुठचा तो

म्हणून का पाऊस रडतो

मुंबई ला का तो घाबरतो


होती जिथे वस्ती झाडांची

वाऱ्यावर डोलणारी फांदी फुलाची

आता उरले मनोरे सिमेंटचे

जिथे तिथे ढिगारे प्लास्टिक आणि कचऱ्याचे

म्हणून का पाऊस रडतो

मुंबई ला का तो घाबरतो


ओहोळ, तलाव राहिले दूर

गटार , नाले आता ह्यांचाच सूर

एक दोन नाही घेतात कित्येकांचा जीव

बुडवली मुंबई पुरे पूर

म्हणून का पाऊस रडतो

मुंबई ला का तो घाबरतो


थांबली वाहतूक खोळंबल्या वाटा

हि आपलीच चूक कळेना कुणाला

किती रे कोसळशी बस कर बाबा

आणि सारा आपला दोष पावसावर लोटला

म्हणून का पाऊस रडतो

मुंबई ला का तो घाबरतो


तरी हि तो कधीच रुसत नाही

पाण्यासाठी रडवत नाही

परतून येतो दर वर्षी

उरल्या सुरल्या वुरक्षवल्ली साठी

आणि येतो चिंब भिजणाऱ्या चिल्ल्या पिल्ल्यां साठी

पाऊस रडतो कागदाच्या बोटी साठी


म्हणून का पाऊस रडतो

मुंबई ला का तो घाबरतो


Rate this content
Log in

More marathi poem from pallavi bhatia

Similar marathi poem from Tragedy