ती असते स्री
ती असते स्री
स्वतःच आयुष्य सोडून जी दुसऱ्यासाठी जगते.
दुसऱ्याच्या सुखात जी स्वतःच सुख शोधते.
स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत जी दुसऱ्यांवर लक्ष ठेवते.
घरचं काम करून जी बाहेरच पण काम संभळते.
दुसऱ्याच्या आपेक्षांसाठी जी स्वतःच्या आवडीनिवडी सोडते.
स्वतःची काळजी न करता जी दुसऱ्यांची काळजी घेते.
एकाच वेळी जी अनेक नाती जपते.
एका नजरेत जी समोरच्या व्यक्तीच दुःख ओळखते.
स्वतःसाठी एक दिवस न जगता दुसऱ्यासाठी आयुष्य जगते.
कितीही संकट आली तरी आपल्या माणसांसोबत खंबीरपणे उभी राहते.
स्वतःची स्वप्न बाजूला ठेऊन दुसऱ्यांची स्वप्न जगते.
ती असते स्री
