दादा
दादा
कधी तो हसता हसता रडवतो.
कधी रडता रडता हसवतो .
हसण्याचे कारण कोणीही असुद्या.
रडण्याचे कारण तोच असला पहिजे.
कारण दुसऱ्यामुळे रडलेल त्याला सहन कुठ होत.
आपल्याला त्रास नको म्हणून.
तो काही गोष्टींना विरोध पण करतो.
त्यात आपल्याला दुखवायचा त्याचा कधीच हेतू नसतो.
कारण आपण काही लोकांना ओळखतो.
पण त्यानं जग पाहिलेल असत.
कधी आपण दुःखी असेल तर तो लगेच ओळखतो.
हसत हसत 100 प्रश्न पण विचारतो.
त्यात पण त्याची काळजी असते.
नेहमी कडू बोलणारा तो जरा चांगल बोलला.
तर ते काही वेगळच वाटत.
आपण कीतीही छान तयार झालो.
तरी त्याला आपण नेहमी खराबच दिसतो.
आपण केलेले प्रत्येक हट्ट तो पुरवत असतो.
आपण बाहेर असेल तर मागेल त्याच्यापेक्षा
जरा जास्तच पैसे तो देत असतो.
आपल्या आवजारून त्याला आपला मूड समजतो.
मग का हसतेस ? का रडते ?
असे अनेक प्रश्न ही तोच विचारतो.
त्याला आपल्याकडून कधी कोणत्याच
गोष्टींची आपेक्षा नसते.
पण तो आपल्यासाठी खूप काही करत असतो.
खर तर म्हणून त्याच्या एवढं निःस्वार्थी प्रेम
आपल्यावर कोण करूच शकत नाही.
