शूर सैनिक
शूर सैनिक
रक्ताची होळी
तो सीमेवर खेळतो
जीव जळतो
मायचा....
रक्षक देशाचा
सणवार नाही त्याला
जागतो कर्तव्याला
हरघडी ....
सैनिक लढतो
करूनी प्रयत्नांची शर्थ
बलिदान व्यर्थ
न जावो.....
बिकट स्थितीत
तमा न कशाची
ऊनवारा पावसाशी
झुंजतो ....
उपकार तयांचे
आम्ही सारे सुखात
आपुल्या घरात
नांदतो .....
