घे उंच भरारी...
घे उंच भरारी...
घालण्या आकाशी गवसणी
हातामध्ये बळ येऊ दे
घेण्यासाठी उंच भरारी
पंखांमध्ये जोर येऊ दे...
प्रगतीचे पंख लेवून
गाठू दे यशोशिखर
उन्नतीच्या पायरीचा
होऊ दे कळस सर...
उंच निळ्या आभाळी
बनून स्वच्छंदी पाखरू
बंधमुक्त होऊन मस्त
संकटांवर मात करू...
अशी घेऊ झेप अवकाशी
बघणाऱ्यांच्या माना उंचावतील
दृढ निश्चयाच्या मार्गावर
यशोमय दिवे लागतील...
ठेवून सकारात्मक दृष्टिकोन
आकाशात झेपायचे असते
हात टेकले आभाळाला तरी
धरतीला विसरायचे नसते...
