STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

रवींद्रनाथ टागोर जयंती!

रवींद्रनाथ टागोर जयंती!

1 min
531

आज गुरुवर्य पडले होते

सभोवती घेऊन कचरा

करण्या घराचा निचरा

नशिबी आले घर विसरा


वाईट वाटले मजला

कंठ दाटून आला

गुरुवरयांचा अपमान

याची देही पाहिला


उचलले गुरुवर्याना

साश्रु नयनांनी आदरांजली वाहूनी

विचार कोणताच न करता

आलो त्यांना प्रेमाने घरी घेऊनि


आदराचे स्थान हृदयी त्यांचे

अबाधीत बाळपणापासून आहे

आज घरी आणता

डोळा भरुनी आनंद वाहे


वडणगेकरांची कलाकृती दुर्मिळ

त्या रूपाने माझ्या घरी आली

दोन दिग्गजांची जणू मज

साथ जीवनी सहज मिळाली....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational